Sanjbhayachya Sajani (Marathi)Author/s:

आधुनिक मराठी कवितेत आपल्या पृथगात्म शब्दशैलीचे बेट मुक्रर केल्यावर आता ग्रेस यांचा हा पाचवा कवितासंग्रह. आयुष्यातील अनेक कडूगोड अनुभवांनी समृद्ध असलेल्या ग्रेसांच्या कवितेत काव्यसंसाराचे टिपण आहे. आत्म्याचा आकांत आहे, मठातील संधिकाल आहे, त्याचबरोबर सतीची प्रार्थना आहे, दग्ध मुलीचे संध्यागीत आहे, बाळाचे शिशिरगाणे आणि श्री ज्ञानेश्वरांची नवी विराणीही आहे. काही कविता या त्यांच्या आयुष्यात डोकावणाऱ्या, त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचणाऱ्या व्यक्तिमत्त्वांविषयीच्या आहेत. त्यातून त्यांची आई, त्यांचे शिक्षक, कर्ण, द्रौपदी, कबीर, जीए, कॉम्रेड वर्धन यांच्याविषयीचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते.

In stock

128 pages

Reading Age and Maturity Rating are generated by AI. Mistakes are possible.

Category: Tag: