Bandu (बंडू)Author/s: Gangadhar Gadgil
- Orders are temporarily disabled due to high demand. Please check back in some time. We apologize for the inconvenience.
सामान्य माणसाने रोजचे जीवन घर, नोकरी नातेवाईक याच्या पलीकडे फारसे जात नाही. नोकरी करून पोटापुरता पैसा मिळाल्यावर लक्ष केंद्रित केल्याने बाहेर काय चालले आहे हे त्याच्या गावीही नसते. चाकरमान्याचे सामान्य आयुष्य जगणाऱ्या बंडू भातखंडे याचे पात्र उभे करून गंगाधर गाडगीळ यांनी त्याच्याभोवती रचलेल्या कथा ‘बंडू’तून वाचायला मिळतात.
स्पर्धेत लागलेल्या बक्षिसाने हरखून गेलेल्या बंडूला वडिलांच्या सल्ल्याने आपण सामन्याच असल्याचा बोध होतो. मित्राप्रमाणे उद्योगपती बनण्याच्या प्रयत्नात बंडूचाच पापड मोडतो. मनाप्रमाणे वागण्याचे, नोकरीत बॉस होण्याची त्याची स्वप्न दिवास्वप्नंच ठरतात. स्वतःला मुल झाल्याचा आनंदही तो नीट घेऊ शकत नाही, तरीही त्याचा संसार स्नेहलतेबरोबर चारचौघांसारखा चालला आहे. बावळट वाटणाऱ्या बंडूच्या आयुष्यातील या कथा विनोदी फोडणी देऊन सादर केल्या आहेत..
Reviews
There are no reviews yet.