आपल्या भोवतालचे परिचित जगच परके वाटू लागल्याची भावना व्यक्त करणारी कविता “प्रत्येक वेळी नवा रस्ता फुटतच असतो”, अशा ओळीने सुरु होणारी ह्या काव्यसंग्रहातील कविता “चालून आलेल्या अनेक रस्त्यांवर फुटत, सांडत, विखरत आले मी, आता परतीच्या वाटेने पुन्हा येताना शोधणे आहे फुटलेले, विखरलेले अनेक तुकडे माझे…” असे अखेरीस म्हणत आहे न् ह्यातूनच ह्या संग्रहातील कविताही व्यक्त होते आहे आणि ही कवयित्रीही ह्या दीर्घ वाटेत, “वाळूत मांडला खेळ घरकुले केली पाण्याने सारी अलगद धुवुनी नेली क्षितिजात उमटले अज्ञाताचे लेख, कुणी पुसून टाकले एकामागुन एक, स्मरणातच सारी चित्रे विरघळलेली” असे झाले आहे तरी त्याबद्दल मर्यादेपलीकडील खंत नाही कारण “कधी दिसावे, कधी हसावे, कधी लपावे, अनंत रूपांत शाश्वताचा प्रवास आहे” अशी कवियित्रीची धारणा आहे. शान्ताबाईंची ‘गोंदण’च्या पुढची वाटचाल ह्या संग्रहात वाचावयास मिळते.
Reviews
There are no reviews yet.