Rikama Canvas (रिकामा कॅनव्हास)Author/s:

भारतीय स्त्रीची प्रतिमा पूर्वीपासून सहनशील, आज्ञाधारक, कुटुंबवत्सल अशी आहे. या प्रतिमेतील स्त्रीचे दर्शन अमृता प्रीतम यांच्या ‘रिकामा कॅनव्हास’ या कथासंग्रहातून दिसते. मात्र, या कथा स्त्रीवादी असल्या तरी यातील स्त्री कुमकुवत नाही, परीस्थितीचे रडगाणे न गाता त्यावर मत करून धैर्यशीलतेचे दर्शन घडविणारी आहे.

‘गंध’मधील पत्नी गुलेरीवर मनापासून प्रेम करणारा, कुटुंबामुळे तिच्यापासून दूर जाऊनही तिच्या प्रेमाने वेद झालेला मानक; दूरच्या नणंदेने वापरून पाहिलेल्या कपड्यांना उष्टे म्हणणाऱ्या सौभाग्यशालिनीला तेव्हा पती व नणंदेच्या संबंधाबाबत कळते तेव्हा ‘उष्टा’ पुरुष ती नाकारते व त्यावरील तिचे चिंतन ‘सौभाग्यशालिनी’त व्यक्त होते. ‘एक मुलगी : एक प्याला’त चीत्राकार सुमेश नंदामध्ये ‘टुणी’ हीच आपली जीवनसाठी असल्याची भावना निर्माण होते.

तिच्या वडिलांना देण्यासाठी पैशांची जमवाजमव करीत असतानाच विष देऊन दुणीला संपविण्यात आल्याचे त्याला कळते. पण, त्यापूर्वी टुणीला दिलेले वचन तो जन्मभर पाळतो. या व संग्रहातील सर्व २५ कथा मनाला भिडणाऱ्या व अस्वस्थ करणाऱ्या आहेत. डॉ. सुप्रिया सहस्त्रबुद्धे यांनी त्याचा अनुवादही तितक्याच ताकदीने केला आहे.

Out of stock

Category: Tag: