1912 Antarcticachya Shodhat (१९१२ अंटार्क्टिकाच्या शोधात)Author/s: Chris Turney
In stock
जगभरातील साहसवीरांनी दक्षिण ध्रुवीय प्रदेशात जाऊन नोंदवलेली निरीक्षणे, त्या प्रदेशातील वास्तव्यादरम्यान त्यांना आलेले अनुभव, तेथील प्रतिकूल हवामानाशी झगडताना होणारा प्राणांतिक त्रास, तिथे नेता येऊ शकणारे प्राणी (घोडे, खेचर, कुत्री), त्या प्राण्यांची उपयुक्तता, तेथील वास्तव्यात खाल्ले जाणारे अन्न (व्हेल माशांचे मांस इ.), तेथील बर्फातून मार्गक्रमण करताना वापरली जाणारी साधने, वैज्ञानिक उपकरणे (होकायंत्र, मॅग्नोमीटर इ.), पोषाख , तसेच या मोहिमांदरम्यान काही जणांना पत्करावा लागलेला मृत्यू इ. विषयीचे उल्लेख म्हणजे ‘१९१२ अंटार्क्तिकाच्या शोधात’ हे पुस्तक. तिथे वापरल्या जाणाऱ्या साधनांमध्ये, पोषाखामध्ये, पादत्राणांमध्ये कालमानाने होत गेलेले बदलही या पुस्तकातून नोंदवले आहेत. एकूणच जगभरातील या साहसवीरांच्या मोहिमांच्या निमित्ताने या प्रदेशाविषयीचा प्रत्येक पैलू उलगडला जातो. संबंधित विषयाची छायाचित्रे, काही नकाशे, साहसवीरांची स्वहस्ताक्षरातील पत्रे, तसेच संदर्भसाधनांचाही समावेश आहे. या मोहिमांमधील थरार आणि साहसवीरांच्या अचाट इच्छाशक्तीचं दर्शन घडवणारं प्रेरणादायक पुस्तक.
Reviews
There are no reviews yet.