Ek Zunj Varyashi (एक झुंज वा-याशी)Author/s: Pu La Deshpande
नाटककार Viaden Dozortsev याच्या मूळ रशियन भाषेतील नाटकाचे ‘The Last Appointment’ नावाचे इंग्रजीतून केलेले भाषांतर मला एके दिवशी वामन केंद्रेने वाचायला आणून दिले. वामन एन. सी. पी. ए. च्या रंगभूमिविकास-प्रकल्पात नाट्यविषयक संशोधनाचे काम करीत आहे. एक प्रतिभावंत दिग्दर्शक म्हणून मराठी रंगभूमीवर त्याने नाव मिळवले आहे. अशा या गुणी कलावंताने मी वाचावी म्हणून आग्रहाने मला दिलेली नाटकाची प्रत मी वाचायला घेतली आणि त्यात रंगून गेलो. एका बैठकीत मी हे नाटक वाचून पुरे केले.
या नाटकातील संघर्ष आणि मनुष्यस्वभावाचे दर्शन हे सार्या मानवजातीला लागू पडणारे आहे; ते केवळ एका भाषेशीच निगडीत नाही. मूळ नाटकातील व्याप्ती आणि त्याची नाट्यमय अभिव्यक्ती मला भावली आणि मूळ नाटकातल्या पात्रांच्या जागी मला मराठी भाषेत बोलणारी आपली माणसे दिसायला लागली. मनापुढे नाटकातल्या व्यक्तिरेखांचा वावर सुरू झाल्यावर तो मराठीतून प्रकट करणे मला अवघड वाटले नाही. आणि त्यातून ही झुंज मी उभी केली. कागदावर उतरलेली ही धुंदी, प्रयोग करणार्या सर्व कलावंतांनी कुठल्याही आर्थिक नफ्याचा विचार न करता, प्रयत्नांची पराकाष्ठा करून प्रेक्षकांपर्यंत पोचवली. ह्या तरूण आणि व्यावसायिक रंगभूमीवर खूप यशस्वी ठरलेल्या नटांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी ज्या जिद्दीने हे नाटक उभे केले त्याबद्दल त्यांचे कौतुक करायला माझ्यापाशी शब्द नाहीत.
~ पु.ल.देशपांडे
In stock
Reading Age and Maturity Rating are generated by AI. Mistakes are possible.
