Gharbhinti (घरभिंती)Author/s:

प्राध्यापक आनंद यादव यांची ‘झोंबी’, ‘नांगरणी’ नंतरची ‘घरभिंती’ही तिसरी आत्मचरित्रात्मक कादंबरी. यात यादव प्राध्यापक झाल्यापासूनचा काळ आहे. या काळात आपले गावाकडचे घर उभे करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ते घर उभे करताना लेखकाची व त्याच्या कुटुंबियांची जी वाताहत झाली,जी पडझड झाली ती सावरण्यासाठी केलेली धडपड ‘घरभिंती’त सामावलेली आहे. घरभिंतीतून दिसणारा आई-मुलाचा संघर्ष उभा करताना यादवांचे शब्द खूप काही सांगून जातात व एक वेगळीच जीवनदृष्टी दाखवतात. श्री. गो.म. कुलकर्णी म्हणतात त्याप्रमाणे आजच्या जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनातही महाभारतसदृश संघर्षपूर्ण घटना केवळ अस्तित्वासाठी घडत असतात. याचे वास्तवपूर्ण भेदक दर्शन म्हणजे ‘घरभिंती’.

In stock

545 pages

Reading Age and Maturity Rating are generated by AI. Mistakes are possible.

Category: Tag: