Hiroshima (हिरोशिमा)Author/s:

दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकले. या शहरांचा विध्वंस झाला. या युद्धानंतर जागतिक राजकारण बदलले. शस्त्रास्त्र स्पर्धा अग्रस्थानी आल्या. याच पार्श्वभूमीवर असलेली ज्येष्ठ लेखक भा. द. खेर यांची ही गाजलेली कादंबरी.

या कादंबरीत १९३९ पासूनचा कालखंड रंगविलेले आहे. कादंबरीचे अग्निबाण, अग्नितांडव, अग्निप्रलय, आणि अग्निदिव्या असे चार भाग पाडले आहेत. जपानने पर्ल हार्बरवर दिलेली धडक, अणुबॉम्बनिर्मितीचे प्रयोग, जपानवर बॉम्बफेक, त्यामुळे, भाजून निघालेले तेथील नागरिकांचे जीवन आणि अखेर हिरोशिमा नागासाकीवर कोसळलेले अणुबॉम्ब हा चित्तथरारक भाग कादंबरीत वाचायला मिळतो. युद्ध नंतरचे जपान आणि राखेतून फिनिक्सप्रमाणे झेप घेतलेले जपानही पाहायला मिळते.

Out of stock

Category: Tag: