Kanad Te Kalam (कणाद ते कलाम)Author/s:

सध्याचा काळ हा विज्ञान-तंत्रज्ञानाचा काळ आहे. मात्र, भारतात या काळाचा पाया खूप पूर्वी रोवला गेला आहे. खूप पूर्वी म्हणजे ख्रिस्तपूर्व ६०० च्या काळात कणाद याने विश्वनिर्मितीच्या कर्त्यांचा शोध घेतला होता. कणादपासून दिवंगत माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्यापर्यंत अनेक शास्त्रज्ञ भारतात झाले. त्यांनी संशोधन क्षेत्रात मोलाची भर घातली. या सर्वांची माहिती रंजन गर्गे यांनी या पुस्तकात दिली आहे.

प्लास्टिक सर्जरीचा जनक सुश्वत, आयुर्वेद व शरीरशास्त्राचा पितामह चरक, बीजगणिताचा जनक ब्रह्मगुप्त, आर्यभट्ट यांच्या कार्याचा परिचय पुस्तकातून होतो. आधुनिक विज्ञानाचा पाया रचणारे प्रसिद्ध गणिती रामानुजन, जगदीशचंद्र बोस यांच्यासह डॉ. जयंत नारळीकर, डॉ. अनिल काकोडकर आदींच्या कार्याची माहितीही समजते.

In stock

149 pages

Reading Age and Maturity Rating are generated by AI. Mistakes are possible.

Category: Tag: