- You cannot add that amount to the cart — we have 1 in stock and you already have 1 in your cart. View cart
‘बिंदूसरोवर’ ही राजेन्द्र खेर यांची अद्भुतरम्य उत्कंठावर्धक कादंबरी. बिंदूसरोवर हे काल्पनिक ठिकाण असलं, तरी त्याची लेखकाने वर्णिलेली रमणीयता आपल्याला वास्तवसदृश अनोख्या विश्वात घेऊन जाते. हिमालय हे योगी-तपस्वी यांचं तपसाधना करण्याचं ठिकाण. स्वामी शिवानंद आपल्या दोन शिष्यांसह एका गुहेत साधना करीत असतात. त्यांच्याकडे परग्रहावरील अतिमानवाने दडवलेली पंचधातूची पेटी असते; ज्यात एक वौqश्वक रहस्य जपलेलं असतं. चिनी सैनिक तिबेटमधल्या पुरातन मंदिरातून त्या पेटीची माहिती मिळवून शोध घेत शिवानंदांच्या गुहेपर्यंत पोहोचतात. योगी आपल्या विश्वनाथन् नामक शिष्याकडे पेटी सुपूर्द करून त्याला दूर रा करतात. प्रा. विश्वनाथन यांच्याकडून व्याख्यानात अनवधानाने या रहस्याचा उल्लेख होतो… आणि पेटी हस्तगत करण्यासाठी अज्ञात व्यक्ती प्राध्यापकांच्या घरी पोहोचतात. तत्पूर्वी ते आपला सुहृद विक्रमकडे पेटी सोपवून त्याला दक्षिणेकडे पाठवतात. रेल्वेत विक्रमला कोण कोण भेटतात… संकटं झेलत ते स्वप्नमयी रमणीय बिंदूसागरापर्यंत कसे पोहोचतात… तेथे त्यांना कोणत्या वौqश्वक रहस्याचा बोध होतो, हे जाणून घेण्यासाठी ही अत्यंत उत्वंठावर्धक कादंबरी अवश्य वाचायला हवी.
Reviews
There are no reviews yet.