R&AW – Bhartiya Gupthersansthechi Romanchak Kahani (रॉ – भारतीय गुप्तहेरसंस्थेची रोमांचक कहाणी)Author/s: Anusha Nandakumar,Sandeep Saket
In stock
माहिती ही ताकद असते, असे म्हटले जाते आणि इतर कुठल्याही यंत्रणेपेक्षा ही गोष्ट गुप्तचर यंत्रणांना अतिशय चपखलपणे लागू होते.भारताच्या रिसर्च अँड अॅनालिसिस विंगच्या म्हणजेच ‘रॉ’च्या संस्थापक-प्रमुखाने प्रसिद्धीच्या झगमगाटापासून अतिशय दूर राहून काम करण्यास आणि जगण्यास प्राधान्य दिले. संयतपणे आणि सुसंस्कृतपणाने काम करत राहिल्यामुळे त्यांच्याकडे लक्ष वेधले गेले नसले तरी काव यांनी भारतीय गुप्तचर यंत्रणेला जागतिक नकाशावर नेऊन ठेवले यात कसलीच शंका नाही. या उत्कंठापूर्ण आणि वाचकांना खिळवून ठेवणाऱ्या पुस्तकात अनुषा नंदकुमार आणि संदीप साकेत यांनी आधुनिक भारतीय गुप्तहेर यंत्रणेचा पाया कसा घातला गेला, याचा मागोवा घेतला आहे आणि नव्यानेच स्थापन झालेल्या ‘रॉ’ने बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेची रोचक माहिती दिली आहे.
Reviews
There are no reviews yet.