संपूर्ण शरीराचा डोलारा ज्या पायांवर उभा असतो, त्या पायांची काळजी घेत; धावपटूंपासून ते सर्वसामान्यांच्या पसंतीला उतरेल असे विविध प्रयोग करत, लोकप्रिय ठरलेला ‘नाइके’ हा ब्रँड आणि त्याचा सर्वेसर्वा फिल नाइट यांची कथा म्हणजे ‘शू डॉग’. या पुस्तकातून नाइके कंपनीचा आत्मा आणि हृदय असलेले पायाभूत संबंध कसे निर्माण झाले आणि त्या परस्पर संबंधांतून सगळं जग बदलून टाकणार्या एका ब्रँडची आणि संस्कृतीची निर्मिती कशी झाली, या प्रवासाला त्याने यातून उजाळा दिला आहे. स्वूश हा आता एक साधासुधा लोगो राहिलेला नाही. स्वूश या लोगोमागे असणारा फिल नाइट नावाचा कर्ताधर्ता ही नेहमीच एक गूढता राहिली आहे; पण आता या आश्चर्यकारक, विनम्र, निर्भेळ, मिस्कील आणि सुंदररीत्या मांडलेल्या स्मृतिकथनात नाइटने हीच गूढता उलगडली आहे. ती सामान्य वाचकांबरोबरच युवा पिढीला, व्यावसायिकांनाही प्रेरणादायक ठरणारी आहे.
Reviews
There are no reviews yet.