Description

सोनाली कुलकर्णी एक गुणी अभिनेत्री आहे..

या विधानानंतर स्वल्पविराम येत नाही,

अर्धविराम किंवा पूर्णविरामही नाही..

येतात ती दोन टिंबं.. दोन टिंबं ही सोनालीची

नुसती लेखनशैली नाही, तर ओळख आहे !

तिच्या लिखाणाला पूर्णविराम फारसे मंजूर नसावेत..

म्हणूनच पाठोपाठ दुसरं टिंब येत असावं.. पुढे नेणारं !

दोन टिंबांमधूनही तिला काहीतरी सांगायचं असतं..

सोनाली उघड्या डोळ्यांनी जग पाहताना माणसांना वाचते

आणि शब्दांतून त्यांची व्यक्तिचित्रं रेखाटते. तिची अक्षरं

वाचकांशी बोलतात.. त्या अक्षरांना लेन्स असते

आणि वाचाही ! अशा संवेदनशील आणि संवादोत्सुक

अभिनेत्रीला रंगभूमीवर आणि पडद्यावर पाहण्या-

ऐकण्याएवढंच ‘वाचणं’ही किती लोभस असू शकतं,

याचं उदाहरण म्हणजे सो कुल टेक 2

Shipping & Delivery
For library customers in Pune, order deliveries may take 0-3 days.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “So Cool.. Take 2 (सोकुल ..टेक २)”

Your email address will not be published. Required fields are marked *