शिकागोच्या कायदाक्षेत्रातल्या एका बड्या कंपनीत अडॅम हॉल नावाचा, सव्वीस वर्षांचा एक तरुण वकील, काम करीत असतो, उज्वल भवितव्याच्या व्यवसायाच्या उंबरठ्यावर तो उभा असतो. मृत्यूशिक्षा झालेल्या कैद्याची शिक्षा कमी करण्याच्या कामी, की जी एक अशक्य कोटीतली गोष्ट होती, त्यासाठी त्याने त्याचे भवितव्य पणाला लावलेले होते. अतिसुरक्षा व्यवस्था असलेल्या मिसिसिपी राज्यातल्या मृत्यूशिक्षा झालेल्यांसाठीच्या तुरुंगात सॅम के हॉल नावाचा एक वृद्ध कैदी असतो, हा त्याच्या तरुणपणात क्लान्स नावाच्या जहाल विचारांच्या टोळीचा सदस्य होता. त्याकाळात त्याने केलेल्या वंशविद्वेशाबद्दल त्याला किंचितसुद्धा पश्चात्ताप वाटत नव्हता. १९६७ मधे घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात काही मनुष्यहानी झालेली होती, त्यामुळे त्याला मृत्यूदंडाची शिक्षा झालेली होती, ती शिक्षा अंमलात आणण्याची वेळ आता आलेली होती. मृत्यूशिक्षा माफ होण्याच्या सर्व शक्यता आता मावळलेल्या असतात. अडॅम हॉल हा उदारमतवादी तरुण होता, तो या के हॉल कैद्याचा नातू असतो, अडॅम त्याला वाचवु शकत होता. मृत्यूशिक्षा अंमलात आणण्यासाठीच्या व्यवस्था, तुरुंगामधे सुरु होतात, मृत्यूशिक्षेला हरकत घेणारे, त्यावेळी तुरुंगाच्या दाराबाहेर निदर्शने करीत असतात, मृत्यूशिक्षेच्या बातम्या मिळविण्याच्या प्रयत्नात टी.व्ही.वार्ताहर दाराबाहेर असतात. अडॅमकडे त्याच्या अशीलाला वाचविण्यासाठी फक्त काही दिवस, काही तास, काही मिनिटेच उरलेली असतात. पण अडॅम व सॅम या दोघांच्यात काही गुप्त गोष्टींची, कौटुंबीक तणावांची दरी होती, त्यातल्या गुप्त गोष्टींच्यातले एक गुपित, सॅम याचा जीव वाचवु शकत होते, पण त्याचवेळी अडॅमचा जीव पणाला लागण्याची शक्यता होती.
Reviews
There are no reviews yet.