- You cannot add "Nakar" to the cart because the product is out of stock.
Vaintey – Ek Garud Yoddha (वैनतेय – एक गरुड योद्धा)Author/s: Pratik Puri
In stock
‘’.त्या कर्कश शिट्टया.ते विचित्र आवाज.ती खिडकी.तिनं भीत भीत त्या खिडकीकडे एक नजर टाकली.तिला हळूहळू आठवत गेलं काल रात्री तिनं काय पाहिलं ते. तिनं घाबरल्या नजरेनं वैनतेयकडे पाहिलं. अंधारात स्पष्ट काही दिसत नव्हतं. पण जे काही दिसलं त्यानं तिला भयचकित केलं. वैनतेयची गादी ठिकठीकाणी फाटली होती. त्याच्या अंगावरची चादर त्याच्या पायांत गुंतली होती आणि.आणि जिथे जिथे ती फाटली होती त्यातून लांब, तीक्ष्ण, वाकडी नखं दिसत होती.आणि त्याच्या हाताच्या मागच्या बाजूने पंख दिसत होते.’’ वैनतेय! अलौकिक शक्ती लाभलेला एक चिमुरडा अनाथ मुलगा! एक गरुड योद्धा! मनुष्य आणि सुवर्ण-गरुडांचे गुणधर्म असणाऱ्या वैनतेयच्या आयुष्यात पावलोपावली संकटं आहेत. सर्प विश्वातील सर्प आणि कापालिक गुरू शतचंडी तर त्याच्या जीवावर उठले आहेत. एका लहान मुलाचा अतिमानव होईपर्यंतचा हा प्रवास विलक्षण आहे. थक्क करणारा आहे. सर्प आणि गरुड-मानवांमधिल प्राचीन संघर्षाची हि अद्भूत कथा वाचकाला पानोपानी खिळवून ठेवते. प्रतिक पुरी या नव्या दमाच्या लेखकाने त्याच्या लेखणीतून साकारलेले हे अद्भुत विश्व लहानथोर प्रत्येकानेच वाचावे असे आहे.
Reviews
There are no reviews yet.