As The Crow Flies (अॅज द क्रो फ्लाइज)Author/s: Jeffrey Archer
Out of stock
सुष्ट व दुष्ट शक्तीवरील संघर्ष हा नेहमीच चाललेला असतो. ‘अॅज द क्रो फ्लाईज.’ जेफ्री आर्चर यांच्या चार्ली व बेकीच्या आयुष्यातील संघर्ष हा कित्येक वर्षं चाललेला असतो. कॅप्टन गायिल्स ट्रेंथममुळे बेकीच्या आयुष्यात वादळे येतात. मिसेस ट्रेंथम या कॅप्टन गायिल्सची आई हे वादळ थांबविण्याऐवजी त्याला हवा देतात. अनेक जीवने त्यात उन्मळून पडतात; पण मिसेस ट्रेंथम आपले एकेक दुष्ट डाव हेतुपूर्वक टाकतच असतात. या सर्वांना चार्ली व बेकी पुरून उरतात. कॅ.गाय व त्याच्या आईने टाकलेला धूर्त डाव चार्ली नेहमीच उघडकीस आणतो. कोण-कोण भेटतं या प्रवासात चार्लीला? अशा परिस्थितीतही चार्ली किती अष्टावधानी राहून प्रत्येक वेळी बेकीचे रक्षण करतो. एक भाजीविक्रेता मोठा होऊन स्वत:चं भविष्य घडवतो. सैन्यात उत्तम कामगिरी करतो. बेकीच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतो. काय आहे चार्ली व बेकी यांच्या सत्याची संघर्षगाथा? जरूर वाचा ‘अॅज द क्रो फ्लाइज’ या कादंबरीतून!
Reviews
There are no reviews yet.