- You cannot add "Patlanchi Chanchi (पाटलांची चंची)" to the cart because the product is out of stock.
गुगेनहाईम वस्तुसंग्रहालयातील एडमंड कर्षचं एक रहस्यमय प्रात्यक्षिक…प्रात्यक्षिकात, निमंत्रितांच्या उपस्थितीत, तो सांगणार असतो मानवाच्या उत्पत्तीसंबंधी आणि मानवाच्या भविष्याविषयी लावलेला शोध… पण तो सांगण्याआधीच कार्यक्रमस्थळी होते त्याची हत्या… हल्लेखोराचं पलायन… तो असतो नौदलातील माजी अधिकारी… कर्षचे गुरू रॉबर्ट लँग्डन आणि वस्तुसंग्रहालयाची मुख्याधिकारी अॅम्ब्रा व्हिडाल (जी स्पेनचे भावी राजे ज्युलियन यांची वाग्दत्त वधू असते) कर्षचा हा शोध जगासमोर आणायचा बांधतात चंग… पण त्यासाठी कर्षच्या महासंगणकाचा पासवर्ड आणि त्या महासंगणकाची जागा शोधण्याचं त्यांच्यासमोर असतं आव्हान… अॅम्ब्राचे सुरक्षारक्षक आणि पोलीस यांचा त्यांच्या मागे असतो ससेमिरा… कर्षच्या खुनाच्या पार्श्वभूमीवर राजवाड्यातून ज्युलियन आणि बिशप वाल्डेस्पिनो गूढ रीतीने गायब होतात…एक जबरदस्त गुंतागुंतीची, उत्कंठावर्धक कादंबरी…
Reviews
There are no reviews yet.