- You cannot add that amount to the cart — we have 1 in stock and you already have 1 in your cart. View cart
BHAVGIRI (भावगिरी)Author/s: Ravindra Dhamapurkar
In stock
मृत्यूच्या सावलीत सतत वावरणारी कोकणी माणसं भुताला घाबरत नसली, तरी त्यांच्या सभोवतालचे जग व त्यांच्या कुटुंबांच्या व्यथा-वेदना-दु:ख, काळजाला पीळ पाडते; कारण कोकणातील निसर्गसमृद्धी जरी आपल्याला वेड लावत असली, तरी परिस्थितीने गांजलेल्या माणसांची दुनिया तिथेही आहेच.गरिबीत दिवस काढूनही कोकणी माणूस काटेरी फणसासारखा आहे. वरून कठोर वाटला तरी त्याच्या हृदयात शहाळं असल्याची जाणीव कायमच दिसते. कोकण म्हणजे पिशाच्चांचं आगर समजलं जातं. मानवी प्रवृत्तीत जसा स्वार्थ-अधाशीवृत्ती दडलेली असते,तीच अतृप्त इच्छा मनात धरून भुतांच्या जगतातील विचित्र असे मानसिक व्रâौर्य, बदला आणि अतृप्त आत्म्यांची घालमेल कोकणकथांतून आपल्याला दिसते. भावगिरी पर्वताचे दर्शन मनाला मोहवणारे, त्यामुळे माणूस कोकण प्रेमात पडला नाही तर नवलच! येथील जीवनानुभव, जीवनसंघर्ष नाट्यमयता, गूढगुंजनात्मकता कोकणचे गाणं बनते… मनात रुंजी घालते. ‘भावगिरी’ पर्वताशी केलेलं हे हितगुज म्हणजे आपल्या गावातील मातीशी असलेलं विश्वासाचं घट्ट नातं!
Reviews
There are no reviews yet.